बालदिना निमित्त-
कविता- बाल- कैफियत
----------------------------------
बालदिना निमित्त सांगतो आम्ही
आई बाबा जरा हो ऐकावे तुम्ही
लहानपणीच्या तुमच्या दिवसांना
आज पुन्हा एकदा आठवा हो तुम्ही
तुम्हीच तर सांगत असता नेहमी
अभ्यास कमी, खेळलो खूप आम्ही
आता वेगळे का वागता मुलांशी
अपेक्षा ओझे किती ठेवता तुम्ही ?
लहानपण कोमेजून गेले आमचे
मुले म्हणजे फुले',कवितेत उरले
मोठ्या माणसांनी विश्व आमचे
रुक्ष, उजाड, करून का टाकले ?
समजून घ्या , उमजून घ्या जरा
द्या आधार या कोवळ्या मनांना
वेळीच सावरा तुमच्या उद्याला
दुखवू नका सतत तुमच्या मुलांना
-------------------------------------- -
कविता- बाल- कैफियत
अरुण वि.देशपांडे- पुणे
9850177342
-----------------------------------------