Marathi Quote in Shayri by Rajashree Nemade

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#Kavyotsav
प्रेम
प्रेम हे एक प्रकारचे नसुन त्याच्या असंख्य भाषा
आणि रुप आहेत.

स्वतःवर न करता जे दुसरयांवर
करतो, तेच खरे प्रेम.

स्वतः भुकेली राहून जी आई आपल्या
बाळाला सर्वात आधी घास भरवते,ते म्हणजे प्रेम.

आपल्याला सर्व सुख सुविधा देण्यासाठी
दिवसभर मेहनत करून जे बाबा आपली सतत काळजी घेतात,
ते म्हणजे प्रेम.

आपल्या मराठी भाषेचा आणि देशाचा
अभिमान बाळगणे,हेच आपले आपल्या देशावरचे प्रेम.

कितीही चूक झाली तरी आपली
नेहमी विचारपूस करणारया बहिणीचे,तेच खरे प्रेम.

झाडाची कत्तल न करता निसर्गाच्या
एका छोट्या भागाचा अंश बनून
त्याचे नेहमी संरक्षण करणे,हेच आपले आपल्या निसर्गावरचे प्रेम.

Marathi Shayri by Rajashree Nemade : 111034295
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now