Marathi Quote in Shayri by Vrishali Gotkhindikar

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#kavyotsav

#नाते

नाती.......................

......नाती..!!!.................
कधी जुळलेली..तर कधी जोडलेली..
कधी असलेली..तर कधी नसलेली
कधी मनातली ..तर कधी जनातली..
कधी खरीखरी..तर कधी चक्क्..खोटीखोटी
कधी घडवणारी..तर कधी बिघडवणारी...
................................................................
......नाती..!!!.........
कधी या जन्मीची..तर कधी जन्म ज्मांतरीची
कधी वयानुरुप..तर कधी वय न जाणणारी.
कधी जाणीव असलेली..तर कधी जाणीव नेणीवेच्या पलीकडली
कधी जबाबदारी जाणणारी..तर कधी जबाबदारी टाळणारी
कधी मन शांत करणारी..तर कधी मन:शांती घालवणारी..
................................................................................
.....नाती..!!!........
कधी मान ताठ ठेवणारी..तर कधी सदोदित अपमान करणारी
कधी मनाला दिलासा देणारी..तर कधी मनाची पर्वाही न करणारी
कधी जीवाला जीव देणारी..तर कधी जीवावर उठणारी
कधी स्वताच विसरुन जाणारी..तर कधी स्वताला विसरायला लावणारी

Marathi Shayri by Vrishali Gotkhindikar : 111034225
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now