English Quote in Shayri by Vrishali Gotkhindikar

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in English daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#kavyotsav

#मैत्री

रें मित्रा ...

किती गुंतवुन ठेवतोस रे तु मला.!!
दिवसभर तर भेटत असतोच..आपण एकमेकांना..
तरी माझा रोज "मेसेज" ..यायला हवा तुला..
तु काहीही नविन केलस...आधी कौतुक मी करायला हव..!!
..ओफिस मधली कटकट..!
,,...बायको बरोबर छोटी छोटी कुरबुर.!
....मित्रांबरोबरचे...लहान सहान वाद.!
..या सार्या गोष्टीत मीच हवी असते तुला
..शांत करायला..!!
अडचण कोणतीही असो..तुला मीच ती दुर करावी असे वाटते..
एवढेच नाही... माझ्या पण आयुष्यात असते..तुझे डोकावणे..!
माझ्या नवर्या बरोबर मी वाद घातलेला..तुला नाही आवडत!!
माझ्या लेकीला ..मी रागावले..तक्रार आधी जाते तुझ्या कडे..
......."या माणसाशी कशाला..जास्त बोलतेस..?""
.........".याच्या कडे पाहुन सारखी नको हसुस."
........"तुला वागायच कस कधी कळणार ग ?"..
.....ओफीसमधे पण तुझ्या सारख्या सुचना असतात..!
कीती ..किती रे बंधने तुझी माझ्यावर..!!!
पण तुला खर सांगु...मला आवडत रे तुझ्या बंधनात रहाणं!!
शेवटी मीच तर आहे तुझी "जिवलग" मैत्रिण हो ना???

English Shayri by Vrishali Gotkhindikar : 111034222
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now