#kavyotsav
#मैत्री
****माझी मैत्रिण......***
जेव्हा पासुन भेटलिय ना
ती मला माझी "मैत्रिण" म्हणुन....
अरे .....यार.....!!
जीवनाचे"मनमोहक"..रंग अनुभवतोय मी जवळुन..
तीच्या स्नेहाचे..पदर असतात ईतके..
की" ईंद्रधनुष्यातही"..नसतील रंग जितके....
माझ्या सुखदु:खात तीलाच सामील व्हायचे असते..!
माझ्या मनातली.."आंदोलनं"..फक्त तीच समजु शकते..
तीची झाली उलघाल...मीच करतो.. "शांतवन"..!
छोट्या मोठ्या तीच्या गप्पा..मीच घ्यायच्या असतात..ऐकुन..!!!!
तीचे रुप..गुण..तीचा स्वभाव..आदर मला वाटतो..
सहवास तीचा सारखा.".हवाहवासा "..वाटतो...
कधी..असते ती एक..उत्सांही..सळसळणारे कारंजे..
"चिंब "..वर्षावात..मला पुरतं ..भिजवुन टाकणारं...!
तर कधी असते ती..एक छोटंस लाडकं' पिलु."..
माझ्यावरच..रुसुन बसणारं..!!!
कधी असते ती..खुप खुप विचार करणारी..
जीवनाचे.."मर्म"..मला समजावणारी..!
तर कधी असते ती..एक "मोहक' प्रेयसी...
"प्रेमाची भाषा," मलाच शिकवणारी..!
आपापसातली.."कुरबुर"..मीच असते मिटवायची..!
सदा..अन ..कदा..तीची" मर्जी"..मीच असते सांभाळायची..!!!
मला झालीये.."सवय"..तीच्या "मनासारखे"..वागायची..!
कारण तीच तर आहे माझी जिवाभावाची.."सखी"..!
छोट्या..छोट्या..गोष्टितुन,,तीच" प्रेम"..जाणवत असतं..!
"माझ्याशिवाय"..तीला जाणणारं..ईतक जवळच कुणीच नसतं..!
..आता ठरवलय..कधीच नाही "साथ"..तीची सोडायची..
काय नाय "पर्वा.."करायची."नशीबाची"..वा" नियतीची"..!!!!