Marathi Quote in Shayri by Tejaswini

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#kavyostsav

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
आईच्या पदराच्या सवलीसारखं असतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
डोक्यावरून फिरणाऱ्या बाबांच्या हातासारखं असतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
दादाच्या धपाट्यातून पाठीवर बसतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
ताईच्या डोळ्यातून झरझर बरसतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
प्रियकर प्रेयसीच्या डोळ्यातून दिसतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
तान्हुल्याच्या स्पर्शाच्या सुखासारखं असतं

प्रेम कसं असतं, प्रेम कसं असतं,
आयुष्याच्या संध्याकाळी फार कमी मिळतं.

Marathi Shayri by Tejaswini : 111034123
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now