हॅश टॅग #Kavyotsav
३) कविता - भावना
मला वाटे...
दुःख नसे माझ्याहून कोणा
शोधी मन मार्ग सुखाचा
दुःखाच्या या डोहात
नाव दिसेल का तारक
सगळी इथे आपली
काढती जखमेची खपली
पळावे सोडून सारे
वाटा इथे अनंत
वाटे लाज मनाची
खोटीच मी का ठरले?
पडत झडत पुढे जाऊ
खाचखळगे ठेऊ झाकून
अग्निशमन बने निरुपयोगी
अंतरीच्या धगीला
कळले मला दुःख नसे ते
ती तर छोटी जखम
उगाच केला बाऊ
कशाला दुःखात राहू
जग हे चिंतातुर जंतूंचे
जखम सदा वाटे मोठी
अनुभव ऐकून परक्याचा
मजला आली समज
भावना असे खोटी