#kavyotsav
||कवितेचे स्वादिष्ट व्यंजन||
कविता लिहिण्याची आवड आहे मला
सवड मिळाली तर पोळी लाटता लाटता
लिहून जाते चार ओळी ...
प्रयत्न करते त्यांनाही सडोल
गोलदार बनवण्याचा...
मग भाजी फिरवता फिरवता
कवितेवरही छिडकवून जाते
प्रास पदांचा थोडा मसाला ...
आणि मग शेवटीअलंकारांच्या
तडक्यांनी देते सजवून त्यांना ....
असे बनवते स्वादिष्ट रुचिकर
कवितेचे व्यंजन....
थोडी खट्टे तर कधी थोडे मीठे
जेवणाचे माहीत नाही पण
कवितेची रुची वाढवण्याचा
जरूर प्रयत्न करते....