Marathi Quote in Shayri by Ashwinee Parkar

Shayri quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#kavyostav
न पाहिले कधी तुला, न स्पर्ष तुझा जाणवला,
तरीही नेहमी तुझ्या अस्तित्वाचा भास होतो मजला|

कोणी म्हणे तू वेडा, तर कोणी म्हणे तू हुशार,
तुझ्या एका विचाराने देखील गडबड होते फार|

कोणी म्हणे नको ऐकू त्याच,कधीही भाळतं कोणावर,
तर कधी कठोर होऊन रूसून बसतो जगावर |

किती ते नखरे तुझे, अन् नसते तोरे
कधीतरी बस शांत ऐकून माझे सारे |

राग, प्रेम, भावना सर्व घेतोस सामावून
कसं रे जमतं तुला मला घ्यायला एवढं सावरुन|

तुझ्या राज्यात असेल कल्पना तुझी राणी
पण कधी नकळत तीही आणून जाते डोळ्यात पाणी|

इच्छिलेले सर्व देणारा तो म्हणे कल्पतरू
मग क्षणातं सर्व भासवणारा तू, तुला काय म्हणू?

सांग ना वेड्या काय म्हणू तुला?
सारं जग मनं म्हणतं,पण तू कळतच नाहीस मला|

अश्विनी....

Marathi Shayri by Ashwinee Parkar : 111032078
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now