#kavyotsav
कविता1
प्रेम संसार
ती तशी------मी असा-----
तरी प्रेम आमच
जस 'हेमलकसा'
मी घरी मुलाचा
घेतो अभ्यास
शाळेत नेण्यासाठी मात्र
तीचाच अट्टहास
भुवया चढवून ती
माझ्याकडून चिरून घेते भाज्या
स्वाद येण्यासाठी स्वतः
फोडण्या देते ताज्या
कोणपे, माळे साफ
तीच करते
टाॅयलेट साफ करण्याची पाळी
माझ्यावर येते
मंदीरात जातांना वागते
जशी असावी काठी
देवापूढे मी हात जोडतो
फक्त तीच्यासाठी
मला आवडतं म्हणून ती
शिकतेय नाचण्याची कला
बदल्यात बाईसाहेबांना बागेमध्ये
झोका द्यावा लागतो मला
हाॅटेलात तीच्या आवडीच्या
मेनूचा भरवतो मी घास
प्रवासात ती मला आणून देते
थंड थंड लस्सीचा ग्लास
खरेदीला जातो तेव्हा ती
धुंडाळते दाही दिशा
मी एका जागी बसून
लपवतो हसणार्या मिशा
एक अकेल्या आयूष्यामध्ये
कधी विचार येतोही दूजा
पण कालातीत आमच्या प्रेमापूढे
संकटांचा पर्वतही होतो खूजा
रडायच कुणीच नाही
ही आमची ताकीद आहे सक्त
तीला नाही एक हात ,मला नाही एक पाय
एवढच आहे फक्त
मस्त चाललाय संसार आमचा
तीन हातांवरचा
प्रेमाचा तंबू कसा भक्कम आहे
तीन पायांवरचा !
----------------