कल्लोळ
बाहेर पाहता अवघा
आकांत आहे माजला
वळचणीला मनीच्या
स्वस्थ तू थांबून पाहे
कोणती मूल्ये अशी
हृदयावरी कोरली
उद्धवस्थ होत आणी
घे पायतळी कोणी
मनगटी जोर ज्यांच्या
होती शिरजोर कोणी
हाती शस्त्र त्यांच्या
मने अस्वस्थ भारी
प्रेमभावे जिंक त्यांना
नको कटुता अंतरी
संघर्षाने काय साधे
कल्लोळ उठती अंतरी
सदानंद चावरे
२२-८-२०१८