The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
व्हॉटस अॅप मेडिटेशन सध्या सगळ्यात लोकप्रिय मेडिटेशन आहे व्हॉटस अॅप मेडिटेशन . एकदा व्हॉटस अॅप नंदी लागली टाळी तेथे देहाते कोण संभाळी ? आधी मेडिटेशनची पहिली पायरी असायची मांडी घालून बसून डोळे मिटणे . आता व्हॉ- मेडिटेशनची पहिली पायरी म्हणजे आरामशीर बसून कान बंद करणे . मग शेजारी भूकंप झालास तरी त्या लहानशा पडद्यावर पाहत बसलेल्या व्यक्तीला ते जाणवत देखील नाही . त्या व्यक्तीचं आणि त्या छोट्याशा पडद्याचं जणू अद्वैत झालेलं असतं . या मेडिटेशन मधे दोन्ही हातांचे अंगठे अगदी विजेसारखे चालत असतात . अगदी अर्जुन आणि एक लव्य दोघांनाही हेवा वाटावा असे ! एकदा व्हॉटसप रंगी रंगल्यानंतर सर्व जगाचे यच्चयावत ज्ञान आपोआपच प्राप्त होते . असे हे मेडिटेशन . जगापासून पूर्ण मुक्ती देणारे . हे मेडिटेशन जरूर करत रहा . पूर्ण टेन्शन रहित होऊन सुखी व्हा .
#आई , तू साठीत पोहोचलीस तेंव्हा एकदा माझ्याशी बोलतांना म्हणालीस , खूप कठीण असतं रे म्हाताऱ्या माणसांचं सगळं करणं. म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच असतं . मला आमच्यापेक्षा तुझी आणि मंजूचीच काळजी वाटते रे अनी ! तुमच्या नोकऱ्या , राधिका चं शिक्षण , कसं रे जमवणार सगळं तुम्ही ? म्हणजे आजारी तू आणि काळजी करतेय आमची . खरंच , हद्द झाली . कधीतरी तुझ्या जवळ येऊन बसल्यावर तू चेहरा ओंजळीत घेऊन आपला खरबरीत हात गालावरून फिरवायचीस तेंव्हा किती रेशमी वाटायचा तो स्पर्श ! सुदैवानं आमच्याकडे रहायला लागल्यावर तुझी प्रकृती सुधारली . काय मजा करायचो नं आपण ! दर रविवारी मी काहीतरी गोड आणलं की बाबा खूष व्हायचे . म्हणायचे - चला .फी स्ट आहे आज मेसमधे ! संध्याकाळी जेवणाला खाडा ! बाबा , तू , मंजू आणि मी , काय मजा यायची ब्रिज खेळतांना . अन हक्कानं तू ' वाफ भरला मऊ तूप मेतकूट भात अशी फर्माईश करून खायची मात्र दोन -चार घास आणि चंगळ व्हायची आम्हा सगळ्यांची . आणि मग एक दिवस मंजू आणि मी माझ्या हृदयरोगासाठी दोन दिवस कुणाच्या तरी सांगण्यावरून कार्ल्याला गेलो काय , तर ती संधी साधून तू अचानक निघून गेलीस ! बाबांचे पाणी भरले डोळे तीन दिवस लाल सर दिसत राहिले .आम्हाला ब्रिज खेळायला बसवून स्वतः डमी झालीस , आणि बागेत फिरते डाव संपेस्तो म्हणून उठलीस , आणि नंतर ती तुझी खुर्ची रिकामीच राहिली गं आई ! त्यानंतर खरच आतापर्यंत आम्ही एकदाही ब्रिज खेळलो नाही . आई, आई , तुझ्या किती आठवणी आई , आता आयुष्यभर त्यांचीच काय ती मायेची साथ - आम्हा दोघांना _ आणि लहानशा राधिकाला देखील !
संध्याकाळी सूर्यास्त पाहणे हा माझा आजकाल नवीनच छंद झाला आहे . पूर्वी मला पाऊस पहायला खूप आवडायचं . आता सूर्यास्त . कशी क्षितिज रेषा दिवसभर झुरत असते सकाळपासून , सूर्य तिच्यापासून दूरावल्यावर ते संध्याकाळी तीव्रतेनं जाणवतं . दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतांना स्पष्ट दिसतात . सोनेरी हे रूप तुझे रे मज जवळी येता येता आरक्त झाले गाल माझे तुला पाहता पाहता . भल्या पहाटे गेलास तू अन एकाकी मी झाले , संध्याकाळी कातरवेळी तुुज साठीच सजले . तुझ्यात मी अन माझ्यात तू मिसळुन जाता जाता रात्रीचे चांदणे निथळले प्रेमात तुझ्या नहाता . असा हा सूर्यास्त आजकाल मला वेगळाच जाणवतो . त्यात नव्या प्रेमाची नवी नव्हाळी नसून पक्व प्रेमाची पूर्ण तृप्ती असते . कदाचित आता भावना स्थिर झाल्याचा हा परिणाम असेल . कदाचित त्या सोनेरी रंगाची गुलाबी जादू असेल . आणि लांब कुठेतरी टूरिस्ट म्हणून जाऊन सनसेट पॉईंट वर सूर्याशी शर्यत लागल्यासारखं घाईनं जाऊन ' वॉव ' करत बसण्याऐवजी आता आमच्या नवीन घराच्या सज्जातून, बाल्कनीतूनच हा विविधरंगी सूर्यास्त आरामखुर्चीत बसून आम्ही दोघे पाहतो तेंव्हा दिवसभराच्या श्रमांचं सार्थक होतं . सोनेरी क्षण रेंगाळत राहतात आणि एकाएकी भराभर प्रकाश संपून रात्रीच्या जांभळ्या मखमली मिठीत आम्ही हरवून जातो . क्षितिजरेषेत हरवून गेलेल्या सोनेरी सूर्यासारखे . किंवा ज्यात सूर्य समर्पित झालाय त्या अदृश्य क्षितिज रेषेसारखे !
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser