The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
ह्रदयांतर तात्वीक भांडण सर्वांशी होते ,पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये... खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये.. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा. "अहंकार" हाच या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण "बाळगुन जगू" नये.. शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे. "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.
पैसा.....फक्त एक जगण्याचं साधन आहे ! लेखक : डॉ. शांताराम कारंडे माणसाच्या खिशात भरपूर पैसा असल्यावर माणसाला वाटतं की आपल्यासारखं सुखी कुणीच नाही. परंतु पैसा जवळ असला तरी आपण आनंदी असण्याची काहीच शाश्वती नसते. आणि जरी जवळ पुरेसा पैसा नसला तरीही दुःख हमखास असतंच. खरं तर पैसा हे जगण्याचं फक्त साधन आहे. पैसा म्हणजेच सर्वकाही असेही नाही, आणि पैशाशिवाय आयुष्यात काहीच करताही येत नाही. आपल्याला ‘ पुरेसा पैसा ’ म्हणजे काय ? हे आयुष्यात कधीही समजत नाही. आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे 'पुरेसा पैसा' म्हणजे नक्की किती ? हे एकदा ठरवलं आणि तेवढा कामवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसा पैश्याची व्याख्या आयुष्यभर समजत नाही. आपल्याला पैसा हा नेहमी आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानाने खूप कमीच मिळतो आहे असंच आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असंही वाटत असतं. आपल्याला जो पैसा मिळतो तो आपल्याजवळ टिकत नाही, मात्र इतरांकडे बरोबर टिकतो असंच आपल्याला वाटत असतं. कधीकधी तर आपल्याला आपल्या मूलभूत गरजांनाही कमावलेला पैसा पुरत नाही, परंतु इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला पैसा असतो असं आपल्याला वाटत असतं. ज्याच्याकडे मुबलक पैसा नाही त्याला अजून पैसा कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे मुबलक पैसे असतो त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट असतो त्याला कितीही कमावला तरी कमीच वाटत असतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं समाधानाने म्हणणारा कुणीच नसतो. प्रत्येकाला अजून पैसा हवा असतो. कितीही पैसा आला तरी गरजा वाढत जातात आणि आलेला पैसा पुरत नाही. काही जणांना दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही. आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा मात्र कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!! पैसा म्हणजेच लक्ष्मी ! पैसा म्हणजेच सर्वस्व ! तो एका दरवाज्यानं जसा येतो तसा हजार खिडक्यांवाटे पसारही होतो! पैसा जवळ आला की खूप छान, भारी, मस्त, आनंदी वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. कधी कधी तर पैसा एकटा येतच नाही. तो येताना सोबत मोठे मोठे आजार देखील घेऊन येतो. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? कि खर्च केल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. अगदी नियमितपणे पैसा मिळवायचा असेल तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो!!!
|| बौद्धमय भारत || संकलन : डॉ. शांताराम कारंडे जगातील सर्व आचार्यांमध्ये वा धर्म संस्थापकांमध्ये बुद्ध हे एकटेच असे होते की, ज्यांच्या महान कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. भगवान बुद्धांसारखा त्यागी महापुरूष या भुतलावर अन्य कुणीही अजून तरी झाला नाही. मानवा मानवातच काय..... पण मनुष्य आणि पशू यांमध्ये देखील जी विषमता आढळते तिचा बुद्धांनी निषेध केला. त्यांच्या मते भूतलावरील सर्व जीव एकसमान आहेत. अवघ्या जगामध्ये बुद्धच असे एकमेव महापुरूष आहेत की ज्यांनी यज्ञातील पशूहत्या थांबविण्यासाठी यज्ञात पशूच्या ऐवजी स्वत:चे जीवन बळी देण्याची तयारी दाखवली होती. भगवान बुद्धांनीच सर्वप्रथम मद्यपान निषेधाचा पुरस्कार केला होता. बौद्ध धर्म हा जगातील पहिला प्रचारक धर्म होता आणि त्याने त्या काळातील सगळ्या सभ्य जगात प्रवेश केला, आणि तरीही या धर्माच्या प्रचारार्थ रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नाही. बुद्ध हे इतर सर्व धर्माचार्यांपेक्षा अधिक साहसी, अधिक प्रांजळ होते. कोणत्याही शास्त्रावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते वेद हे थापाडे होते आणि सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वत: मीच आहे, असे ते म्हणत. जगाला सर्वांग सुंदर नीतिशास्त्राची शिकवण देणारे बुद्ध हेच पहिले मानव होते. बुद्ध हे एक थोर समाज सुधारक होते. भारतातील थोर तत्त्वज्ञांमध्ये बुद्ध हेच असे एकमेव होते की ज्यांना जातिभेद मान्य नव्हता. भगवान गौतम बुद्धांनी प्रचंड शक्तीशाली सत्याची शिकवण दिली. सर्व जगाला त्यांनी भेदभाव न करता शिकवले, कारण ‘मानवाची समानता’ हा त्यांच्या महान संदेशांपैकी एक मुख्य संदेश होता. म्हणून बुद्ध हे समतेचे महान उपदेशक होते. आतापर्यंत आपल्याला शालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, "बौद्ध" राजांनी ह्या भारतावर तब्बल १२०० वर्षे राज्य केले. प्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे "पाली" भाषा ही भारताची "राजभाषा" होती, तर "बौद्ध" धम्म देशाचा "राजधर्म" होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल २००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या. म्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व टिकून आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास, प्राचीन भारत हे "बौद्धराष्ट्र" होते ह्याचीच ग्वाही देतात. जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १५० कोटी आहे. ही लोकसंख्या तलवारीच्या जोरावर निर्माण न होता, तत्वज्ञान व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली आहे. बौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे पाल असे छोटे मोठे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला. म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी "बौद्ध" तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची १९ विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध् विद्यापीठांनी केले. भारत जेव्हा "बौद्धमय" होता, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता. भारत खऱ्या अर्थाने सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता. आजही भारताला संपूर्ण जगात "बुद्धाचे राष्ट्र" किंवा "बुद्धभूमी" म्हणूनच ओळखतात. महिलांना मान-सन्मान होता, सर्वांना न्याय मिळत होता. जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे ३०% हून अधिक होता. सोन्याचा धूर याच काळात भारतात निघत होता. भारतात कुठेही उत्खनन केले तर तथागत बुद्धांच्या मूर्त्याच सापडतात. एका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की, ज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय. "बौद्धमय भारत" हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.
रद्दी.............! लेखक : डॉ. शांताराम कारंडे हरी रद्दीवाला नावाचा एक मस्तवाल, मोकळ्या मनाचा गरीब माणूस दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असे. असाच एके दिवशी तो हरी रद्दीवाला एका चिकू मारवाडी असलेल्या प्रीती नामक गृहिणी कडून रद्दी विकत घेताना बरीच घासाघीस करायला लागल्यामुळे वैतागला होता. तरीही धंद्यामध्ये मंदी असल्याने भाव वाढवून द्यायला तयार तो होतो. मग वजन करण्यासाठी हातगाडीवरील तराजू आणण्याच्या हेतूने तो हरी परत रस्त्यावर जातो तोच त्याची नजर चुकवून ती प्रीती नामक गृहिणी त्या रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा खोलून न बघताच हरी त्याचे वजन करतो आणि पैसे देऊन तो गठ्ठा घेऊन जातो. संध्याकाळी प्रीतीचा नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली पाहताच आश्चर्याने विचारतो, आज जेवण बनवायचं नाही का ? त्यावर प्रीती नवर्याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा विचारतो, माझ्याकडे तर पैसे नाहीत, तुला लॉटरी लागली का ? मग परत समजवतो, पुढच्या आठवड्यात बघू. त्यावर प्रीती म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! तीही चांगल्या भावात ! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझे एक जाडजूड फोल्डर होते ते दिसत नाही ? ते कुठं आहे ? तू घेतलयस का ? बायको उत्तरते, ते टेबलावर होतं ते फोल्डर होय ? मी जास्त पैसे मिळवण्यासाठी रद्दीत विकून टाकलं! नवरा झटक्यात खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, आयुष्यभराची सर्टिफिकेट्स होते त्यात? लाखो रुपये खर्चून..... अभ्यास करून त्या पदव्या मिळवल्या होत्या. आता त्या डिग्र्या मी कश्या परत मिळवू ? त्याचवेळी हरी आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट त्याच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून तो दुःखी-कष्टी होतो. मग ती विट बाजुला ठेऊन आणि हरी परत आपल्या कामाला लागतो. काही वेळाने सर्टिफिकेट्सचा तो लिफाफाही त्याच्या हाती लागतो. आत पाहतो तर अनेक मोठ्या डिग्र्यांची सर्टिफिकेट्स! हरी मात्र पाहताच राहतो. इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नसते. एकमेकांवर खेकसाखेकशी करत कसेबसे रात्र ढकलतात. सकाळ होताच ते दोघे त्या रद्दीवाल्याला शोधून काढतात. तो दिसल्याक्षणीच विचारतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलास? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. आता मात्र हरी त्याला वरून खालून न्याहळतो आणि एका क्षणात चौकशी न करता एक मोठा लिफाफा त्याच्या हातात ठेवतो. इतक्या सहजतेने परत मिळालेली सर्टिफिकेट्स पाहून नवरा-बायकोच्या आनंदाला उधान येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझ्या आयुष्याची कमाई गेलीच होती. आता हे घे तुला माझ्याकडून पैसे खास शाॅपिंग करायला! रद्दीवाला हरी खरंच बावळट निघाला. कारण तो त्या नवऱ्याला आरामात ब्लॅकमेल करू शकत होता. आयुष्यभर मेहनत करुनही मिळवलेली सर्टिफिकेट्स करीता बक्षीस म्हणून हजार पाचशे रुपये नक्कीच मिळाले असते..... त्यामुळे रद्दीवाला हरी हा खरंच बावळट निघाला! नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेला हरी बाहेर येऊन म्हणतो, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली होती माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात लाख रुपये मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळवितो, त्यामुळे रात्री शांतपणे झोपी जातो, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही.
'डी’मार्ट........एक यशोगाथा ! लेखक : डॉ. शांताराम कारंडे "डी मार्ट" या सुपरिचित व यशस्वी ब्रॅण्डचे सर्वेसर्वा आहेत खूपच साधी राहणी असलेले "श्री. राधाकृष्ण दमाणी". टाटा, बिर्ला, अंबानी किंवा अडाणी यांच्याप्रमाणे फारसं प्रकाशझोतात नसलेलं हे महान व्यक्तिमत्त्व आपल्याला माहीत नसणं स्वाभाविक आहे. कारण भरपूर प्रसिद्धी, टी व्ही वर जाहिराती आणि अमाप मुलाखती किंवा वारंवार पत्रकार परिषदा घेणे..... अशा गोष्टींपासून राधाकृष्ण दमाणी खूप अंतर ठेवून आहेत. कधीकाळी मुंबईतील ‘स्टॉक एक्स्चेंज’ या ठिकाणी एक साधा शेअर ब्रोकर म्हणून कार्यरत असलेल्या राधाकृष्ण दमाणी यांनी भारतात नुकतीच रुजू घातलेली रिटेल संस्कृती ओळखून या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्वतंत्र आउटलेट उघडण्यापासून सुरुवात करण्याऐवजी नवी मुंबईतील नेरुळ येथील ‘अपना बाजार’चं दुकान त्यांनी प्रथम विकत घेतलं. ते इमाने इतबारे चालवून पाहिलं. ते चांगलं चालल्यानंतर त्यांनी ‘डी' म्हणजेच 'दमाणी’ या नावाने पाहिलं 'डी’मार्ट सन २००२ साली पवई येथे सुरू केले. नुसत्याच धडाकेबाज, भपकेबाज खोट्या जाहिराती करण्याऐवजी स्वस्त पण चांगला माल ग्राहकांना विकायचा हा श्री. दमाणी यांचा दृष्टिकोन नक्की केला होता. ग्राहकांना खरेदीचा श्रीमंती शाही अनुभव देण्यापेक्षा साधेपणातून त्याच्या खिशाची श्रीमंती वाढवण्याचा दमाणींचा विचार अचूक ठरला. डी’मार्टमध्ये खरेदी करणाऱ्यांचा वर्गभेद त्यांनी ठेवलाच नाही. अगदी बिस्कीट, डाळ, तांदुळ यापासून ते पावडर, साबणापर्यंत सगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी इथे गरीब आणि श्रीमंत दोघेही महिन्याचं सामान भरायला एकाच रांगेत उभे राहतात. याचं कारण एकच.. खरेदी हा कितीही स्टेट्सचा प्रश्न करायचा म्हटला तरी ‘डेली डिस्काउंट, डेली सेव्हिंग्ज’ या टॅगलाइनपुढे सगळ्यांची मान झुकते. ग्राहकाची हीच मानसिकता तंतोतंत ओळखल्यामुळेच आतापर्यंत सुरू झालेलं डी’मार्ट या साखळीचं एकही शोरूम बंद पडलं नाही. बरं, ग्राहकांना तरी दुसरं काय हवं असतं? दैनंदिन वापराच्या वस्तू त्यांना रास्त व डिस्काउंट मध्ये मिळाव्यात. आणि हे काम कोणत्याही गाजावाजाविना डी’मार्ट उत्तम प्रकारे करतंय. प्रत्येक व्यक्तीला बाजारहाट हा शब्द अतिशय सुकर करणाऱ्या रिटेल साखळ्या भारतात आल्या आणि भारतीयांच्या खरेदीची व्याख्या बदलू लागली. हातात पिशवी घेऊन दुकानात जाणे मग तिथल्या गर्दीतून वाट काढत आपली यादी पुढे रेमटवणे. दुकानदार जे सोपवील ते घेऊन परतणे या सगळ्या अनुभवावर फुल्ली मारत ग्राहकाला निवडीचा अनुभव देत, आपल्याला हवं ते उत्पादन प्रत्यक्ष हाताळण्याची आणि प्रत्येक किमतीत तुलना करण्याची संधी देत, गारेगार अनुभव देणाऱ्या रिटेल साखळीतील एक मोठं नाव म्हणजे डी’मार्ट. भारतीय शहरी भागातील मंडळींसाठी आता हा ब्रॅण्ड काय नवा राहिलेला नाही. आणि दिवसेंदिवस डी’मार्ट चा होणारा विस्तार पाहता लवकरच तो खेडोपाडी सुद्धा पोहोचेल यात तिळमात्रही शंका नाही. जीवनावश्यक रोजच्या वापरातील वस्तू डी’मार्टमध्ये उपलब्ध करून देताना दमाणी यांनी अवलंबलेली नीती कोणत्याही नवउद्योजकासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. श्री. दमाणींनी कोणत्याही डी’मार्ट शोरूमची जागा भाडय़ाने घेतली नाही हे विशेष ! प्रत्येक जागा ही त्यांनी खरेदी केलेलीच आहे. त्यामुळे त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा झाला. दमाणी यांनी उद्योग सुरू केल्यानंतर तो विस्तारण्याची बिलकूल घाई केली नाही. लहान लहान पावलांनी विस्तारणाऱ्या व्यवसायावर उत्तम नियंत्रण ठेवता येते हे त्यांना अचूक माहीती होते. रोजच्या वापरातील वस्तूंवर डी’मार्टमध्ये भरघोस सवलत मिळते, कारण रिटेल साखळीतील मंडळी पुरवठादारांना आठवडय़ाने किंवा महिन्याने पैसे चुकते करत असताना डी’मार्टने मात्र ताबडतोब पैसे द्यायचे धोरण ठेवले. लगेच पैसे मिळतात हे पाहिल्यावर पुरवठादारांनीही वस्तू कमी किमतीत डी’मार्टला विकायला सुरुवात केली. त्यामुळे बाहेरच्यापेक्षा दैनंदिन वापराच्या वस्तू इथे कमी किमतीत उपलब्ध होऊ लागल्या. हेच धोरण आता अन्य रिटेल साखळ्यांनी अवलंबायला सुरुवात केली आहे पण या कल्पनेचं श्रेय फक्त डी’मार्टलाच जातं.
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser