नामप्रभात
श्रीराम. अनुताप होऊन निर्माण झालेल्या शरणागतीमध्ये मोठा चमत्कार असा घडतो की जीवाचा भूतकाळ ईश्वर गिळून टाकतो. त्यामुळे जीवाचे सर्व अशुभ, सर्व पाप धुतले जाऊन तो पुण्यात्मा होतो.
अशा अनुतापदग्ध माणसाला भेटण्यास संत आपणहून येतात. मग तो ईश्वर दर्शनाच्या मार्गावर निर्धास्तपणे चालू लागतो. त्याच्या साधनाला सद्गुरूंच्या कृपेचा पाठिंबा असल्याची प्रचीती वेळोवेळेला येते. आपल्या साधनाचे पर्यवसान काय होणार आहे याचा विचार त्याला स्पर्श करीत नाही. ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरे काही तो करीत नाही