शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु होती. झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावामध्ये प्रभातफेरी काढायची असल्याची सुचना मुलांना देण्यात आली. सुंदर गजरा घालुन आणि नटून - थटून आलेली पिंकी सर्वांच लक्ष वेधत होती.
बघता - बघता प्रमुख पाहुण्यांच आगमन झालं. मोहनलाल आणि त्यांच्या पत्नी शशिकलाबाई व्यासपीठावर आसनस्थ झाल्या. मोहनलाल यांनी या वर्षी भरपूर देणगी दिली होती. पण देणगी देताना त्यांनी शाळेला अनेक अटी घातल्या होत्या. पहिली अट होती, शाळेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्याचं हस्ते ध्वजारोहन झाल