नमस्कार-नवी कविता अभिप्रायसाठी-
दै.नवराष्ट्र -नागपूर- दि.२२-१२-२०२५
अंकात प्रकाशित
****
कवी अरुण वि.देशपांडे
चंद्र
****
वाट्यास आली काळी रात्र विरहाची
कोमेजे मुखचंद्र ,चांदणी दूर त्याची ।।
चंद्र प्रतिबिंब दिसे जळात साजरे
झोंबती एकट्यास शीतल ते वारे ।।
बिलगलेल्या जोड्या दिसे काठावरी
आठवण होता तिची कळ उठे अंतरी ।।
करिती जोडपी साजरी ही कोजागरी
त्याच्यासाठी मात्र एकांतरात्र अंधारी ।।
असतो म्हणे चंद्र प्रेमाचा साक्षीदार
का आले वाट्या क्षण विरह टोकदार ।।
बा चंद्रा, तू मित्र आहेस न त्याचा
संपवून टाक तूच वनवास त्याचा ।।
********************************
कवी अरुण वि.देशपांडे-पुणे
९८५०१७७३४२
********************************