🌺ड्राय फ्रूट मोदक 🌺
घरच्या गौरी गणपतीचे विसर्जन
आजचा नेवेद्य
🌺काजू,बदाम, पिस्ता,अक्रोड.काळी मनुका. बेदाणे
हव्या त्या आकारात चिरून घ्या
काळा खजुर, लाल खजुर बिया काढून बारीक तुकडे करा
हे सर्व तुपावर थोडं परतून घ्या
🌺 मोदकासाठी एक वाटी कणीक व एक चमचा डाळीचे पीठ घेऊन
त्यात चवी पुरते मीठ घालून
कडकडीत तेलाचे मोहन घाला
मोहन पिठात चांगले मिसळून
कणीक घट्ट भिजवावी
🌺तासाभराने वरील ड्राय फ्रुट सारण भरुन मंद आचेवर तळून घेणे
🌺हे ड्राय फ्रूट सारण जरी कोरडे वाटले तरी खजुर तुकड्यांमुळे चांगलें मिळून येते