🏵️इडली रव्याची खांडवी
🏵️साहित्य
एक वाटी इडली रवा
एक चमचा तूप
पाऊण वाटी गुळ
वेलदोडे पुड
सुक्या खोबऱ्याचा कीस
🏵️कृती
एक वाटी इडली रवा थोड्या तुपावर खमंग भाजुन घेणे
पाऊण वाटी गूळ सव्वा वाटी पाण्यात चांगला उकळून घेणे
हे उकळलेले गुळाचे पाणी भाजलेल्या रव्यावर हळूहळू टाकून चांगल हलवुन झाकण ठेवणे
वाफ आल्यावर त्यात वेलदोडे पूड घालून
हे मिश्रण गरम असतानाच एका थाळीत थापणे
वरती सुक्या खोबऱ्याचा कीस पसरणे
थंड होण्यासाठी ठेवणे
थंड झाल्यावर चौकोनी आकारात वड्या कापणे
खांडवी तयार आहे