🌟उपवास स्पेशल
राजगिरा कोहळा थालिपीठ 
🌟साहित्य 
राजगिरा पिठ एक वाटी
एक वाटी कोहळा किस
बारीक चिरलेली मिरची
कोथींबीर
जीरे 
मीठ चवीनुसार 
आवडत असल्यास साखर एक चमचा 
भाजलेल्या दाण्याचे कूट अर्धा वाटी
🌟कृती 
कोहळा किसात मीठ घालून
त्याच्या सुटलेल्या पाण्यात 
त्यात वरील सर्व साहित्य घालावे 
कोहळा पाणीदार असल्यानं वेगळे पाणी घालायची गरज नाही 
तव्यात तूप घालून
थालपीठ लावावे
कडेने तूप सोडून खमंग भाजुन घ्यावे
सोबत ताक लोणी..