#ठंडा_ठंडा_कूल_कूल
🧋डिलक्स फालुदा
नावातच डिलक्स आहे
कारण यातले सर्वच पदार्थ चांगल्या आरोग्य साठी सर्वोत्तम आहेत
खालील कृती दोन माणसांसाठी आहे
साहित्य
तीन वाट्या दुध
सहा चमचे चीया सीड
दहा बारा मखाणे
चार मोठे चमचे ओटस
एका डाळिंबाचे दाणे
दहा बारा बदाम काजू काप
दहा काळया मनुका
दहा बेदाणे
दहा ब्लॅक बेरी
थोडे लाल गाजराचे तूकडे (माझ्याकडे होतें म्हणून 😊)
यात तुमच्या आवडीचे कोणतेही कॉम्बो करता येईल
फळांचे तुकडे पण घालता येतील
दोन चमचे खारीक पावडर गोडी साठी ..
कृती
प्रथम एक वाटी दुध घालून सर्व्हिंग ग्लास मध्ये चिया सीड भिजत ठेवा
साधारण पंधरा ते वीस मिनिटात ते चांगले फुगतील
एक बेस तयार होईल
त्यावर आता थर देत चला
मखाणे पाच सहा
दोन चमचे ओटस
पाच सहा काजु बदाम काप
पाच मनुका
पाच बेदाणे
पाच बेरी
पाच सहा लाल गाजराचे पातळ तुकडे
सर्वात वर अर्ध्या डाळिंबाचे दाणे
हे घालून ग्लास फ्रीजमध्ये ठेवा
दोन तासांनी ग्लास बाहेर काढून त्यात दोन वाट्या दुध आणि खारीक पावडर घाला
पुन्हा ग्लास फ्रिज मधे ठेवा
आता खायच्या वेळेस ग्लास बाहेर काढून संपुर्ण मिश्रण खालीपासून वरपर्यंत हालवून एकजीव करून घ्या
मग निवांत या थंडगार चविष्ट मन आणि आत्मा शांत करणाऱ्या पोटभरू स्वादिष्ट फालुदा चा आस्वाद घ्या 😊😊