🟠साहित्य
मुग डाळ एक वाटी
अर्धी वाटी तूप
साखर पाऊण वाटी
आवडीनुसार ड्राय फ्रूट तुकडे
🟠कृती
🟠 प्रथम मूगडाळ स्वच्छ धुवून दोन तास भिजवून ठेवा.
नंतर पाणी निथळून मिक्सरमधून रवाळ वाटून घ्या.
आता गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप घाला.
🟠मध्यम आचेवर डाळीचे वाटण सोनेरी रंग येईपर्यत भाजून घ्या. भाजलेले वाटण कढईतून बाजूला काढून घेऊन त्यात पाक करायला घ्या.
🟠 पाक तयार करण्यासाठी जितकी साखर तीतकेच पाणी घ्या.
एकतारी पाक तयार करा
तयार पाक बोटात घेतल्यावर एक तार आली पाहिजे
🟠पाक तयार झाला की त्यात भाजलेल्या मूग डाळींचे वाटण घालून सर्व एकत्र मिसळून घ्या
पाच मिनिटे मंद आंचेवर हलवत रहा
नंतर वेलदोडे पावडर टाकून एकसारखे करून घ्या. झाला गरम गरम हलवा तयार...
🟠आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून सजवा