🩸मूग उडीद डाळ वडे..
🩸कृती ..
🩸प्रथम आदल्या दिवशी रात्री दीड वाटी मूग डाळ
अर्धी वाटी उडीद डाळ
चमचाभर मेथ्या भिजत घालणे
चिमुटभर सोडा डाळी भिजवताना घातल्यास डाळी छान फुलतात .
🩸सकाळी हे सर्व अत्यंत कमी पाण्यात थोडी मिरची,जिरे , किसलेले आले व कढीलिंब घालून भरड वाटून घेणे
त्यात मीठ, आवडीनुसार तिखट, हळद, गरम मसाला
लिंबू रस ,तीळ , कोथिंबीर ,कसुरी मेथी घालून
मिश्रण चांगले एकजीव करणे .
🩸तेल प्रथम चांगले तापवून घेणे नंतर आच मंद करणे .
आता थोडे पाणी हाताला लावून
या मिश्रणाचे मध्यम आकाराचे मध्ये भोक पाडून वडे थापणे
🩸अलगद तेलात सोडून खरपूस तळणे
सोबत दह्यात कालवलेली हिरवी चटणी