सोया नुडल्स
साहित्य
2 कप उकडलेले सोया नुडल्स
2 चमचे तेल
बारीक केलेले आलं आणि लसूण
चिरलेला कांदा
गाजर
कोबी आवडीनुसार भाज्या
सोया सॉस
साखर
मीठ
कृती
एका नॉनस्टिक कढईत तेल घ्या. त्यात आलं, लसूण, कांदा, नीट परतून घ्या
त्यानंतर त्यात गाजर आणि कोबी घाला. थोडे कच्चे ठेवा
वरून साखर, सोया सॉस आणि मीठ घाला आणि मग नुडल्स घालून परता
गरमागरम नुडल्स डिशमध्ये घालून वरून कांदा पात घालून सजवा