मस्त थंडी
मस्त नाश्ता
#पनीरपराठा
पनीर खिसुन घेणे
दोन वाट्या पनीर च्या खिसा मध्ये
तुपात परतलेला एक बारीक चिरलेला कांदा
एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद , पाव चमचा आमचूर पावडर , बारीक चिरलेली कोथिंबीर , एक मिरची बारीक चिरलेली , एक चमचा गरम मसाला, चवी पुरते मीठ घालून छान एकत्र करून घेणे .
पराठा
अर्धी वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा , दोन चमचे दही , एक चमचा तुप , चवी पुरते मीठ, घालुन घट्ट्सर मळुन घेणे
अर्ध्या तासाने पनीर भरून पराठा लाटावा व साजुक तुप सोडून भाजुन घ्यावा
सोबत दही , छुंदा , आणि राजमा
राजमा
राजमा कुकर मध्ये शिजवून घ्यावा
एक मोठा कांदा बारीक चिरून
एक टोमेटो बारीक चिरून घ्यावा
तुपावर दालचिनी, तमालपत्र घालावे
त्यानंतर बारीक कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा
नंतर टोमेटो व कसुरी मेथी घालुन परतावे
वर गरम मसाला , तिखट, हळद घालावे
राजमा घालुन चवी पुरते मीठ घालावे
व अंगा बरोबर पाणी घालावे
झाकण ठेऊन दहा मिनिटे शिजवावे
वाढताना वरून कोथिंबीर घालावी