🍒गाजर मटार फ्राय राईस 🍒
🍒साहित्य
एक वाटी गाजर तुकडे
एक वाटी मटार
एक वाटी बासमती तांदुळ
एक कांदा पातळ स्लाइस करून
एक मिरची उभी मध्यात चिरुन
दालचिनी एक
दोन तीन लवंग
पाच सहा काळी मिरी
चार वेलदोडे
थोडी कसुरी मेथी
तूप
🍒 तांदुळ शिजवून
एका ताटात काढून काट्या चमच्याने मोकळा करून थंड करून घ्यावा
त्यात चवी प्रमाणे मीठ व मिरच्यांचे तुकडे मिसळून घ्यावे
गाजर तुकडे व मटार पाण्यात वाफवुन घ्यावे
व बाजुला ठेवावे
🍒पॅन मधे तूप घालुन
लवंग काळी मिरी दालचिनी वेलदोडे घालावे व पातळ कांदा घालून कांदा गुलाबी करून घ्यावा
त्यात गाजराचे व मटारचे तूकडे घालून परतून घ्यावे
🍒 त्यावर मोकळा केलेला भात घालून झाकण ठेवून वाफ आणावी
थोडी कसुरी मेथी कोथिंबीर घालावी..
तळलेले काजु वरती घालावे
सजावट स्ट्रॉबेरी 🍓 तुकडे