♦️सोया मंचुरीयन
♦️सोयाबीनमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे (Vitamin) आढळतात.
तसेच मॅग्नेशियम, आयरन आणि सोयाबीनमध्ये प्रथिने देखील असतात,
यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. सोयाबीनचे सेवन केल्याने आपण आपले वजन कमी करू शकतो कारण त्यामध्ये अनेक पोषक घटक आसतात. जे आपल्याला फायदेशीर ठरतात.
असे गूगल सांगते 😊
♦️बाजारात सोया चंकस किंवा सोय बॉल्स मिळतात
याचे अनेक पदार्थ करता येतात
हा एक चविष्ट आणि सोपा पदार्थ
♦️साहित्य
पंधरा ते वीस सोया बॉल्स
पातीचा कांदा
बारीक चिरलेले आले
बारीक चिरलेला लसुण
🌶️ चिली सॉस
टोमॅटो 🍅 सॉस
सोया सॉस मीठ चवीप्रमाणे
दोन मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर
♦️कृती
प्रथम सोया बॉल्स पाण्यात उकळून घ्यावे
गार झाल्यावर हलक्या हाताने पिळून पाणी काढून टाकावे
एका पॅन मध्ये तेल टाकून
ते तापल्यावर त्यात आले लसूण घालून चांगले परतून घ्यावे
त्यावर चिरलेला पातीचा कांदा घालून परतावे
♦️त्यात दोन चमचे सोया सॉस, चिली सॉस, मीठ घालून चांगलं मिसळून घ्यावे
पाण्यातून बाहेर काढलेले सोय बॉल्स घालून हलवून घ्यावे
दोन चमचे कॉर्न फ्लॉवर पाण्यात मिसळून
हे द्रावण पॅन मधे घालावे व हलवावे
♦️एक वाफ आल्यावर सोया मंचुरियन तयार आहे
झाकण ठेवावे लागत नाही
पातीच्या कांद्याने सजावट केली 😊