🎀गुलकंद शिरा
🎀साहित्य
रवा - एक वाटी
तूप - पाव वाटी
साखर - अर्धी वाटी
दूध - अर्धी वाटी
गुलकंद - अर्धी वाटी
वेलदोडे पूड - पाव चमचा केशर चार काड्या
सजावटी साठी टुटी फ्रुटी काळी मनुका
🎀कृती
प्रथम कढईमध्ये तूप घालून मध्यम आचेवर रवा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा.
🎀मग यामध्ये साखर आणि दूध घालून हे सगळे एकजीव होईपर्यंत हलवायचे
रवा चांगला फुलला की शिरा मोकळा होण्यास सुरुवात होते.
गुलकंद गोड असतो त्यामुळे साखर आधीच कमी घालावी.
🎀त्यानंतर यामध्ये गुलकंद, वेलची पावडर घालून पुन्हा एकजीव करायचे, आवश्यकतेनुसार कडेने पुन्हा तूप सोडायचे.
आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची.
🎀पाच मिनीटांनी गॅस बंद करुन गरमागरम शिरा खायला घ्यायचा.
गुलकंद आणि वेलदोडे पूड या मुळे शिऱ्याला एकप्रकारचा मस्त स्वाद येतो😋