🟢 मैसूर बोंडा
नुकतीच कोस्टल कर्नाटक ट्रीप झाली
हा पदार्थ खाण्यात आला
आवडल्या मुळे लागलीच करून पाहिला
🟢पारंपरिक पदार्थ या यादीत मैसूर बोंडा हा पदार्थ अग्रक्रमी आहे.
दाक्षिणात्य पदार्थांच्या यादीतील मैसूर बोंडा हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.
कुरकुरीत फुललेला मैसूर बोंडा हा म्हैसुरचा सुप्रसिद्ध पदार्थ दिसायला जेवढा सुंदर तेवढाच खायला चविष्ट आणि बनवायला तर अगदी सोपा आहे.
बाहेरील बाजूने कुरकुरीत आणि आतील बाजूस मऊ स्पंजसारखे असतात.
🟢 साहित्य
दही एक वाटी
तांदळाचे पीठ अर्धा वाटी
मैदा एक वाटी
आलं (किसून घेतलेलं) चमचाभर
जिरे एक चमचा
चार हिरव्या मिरच्या (बारीक चिरुन घेतलेल्या)
कोथिंबीर
खायचा सोडा पाव चमचा
मीठ चवीनुसार
कढीलिंब एक डहाळी (बारीक चिरुन घेतलेला)
तेल
🟢कृती
एका मोठ्या बाऊलमध्ये दही घेऊन त्यात तांदळाचे पीठ, मैदा, किसून घेतलेलं आलं, जिरे, बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खायचा सोडा, बारीक चिरलेला कढीपत्ता व चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
🟢हे सर्व जिन्नस एकजीव करुन घ्यावे
हे पीठ हाताने फेसत असताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे
हे पीठ ढवळत असताना ते एकाच दिशेत पाच सात मिनिटे फेसून घ्यावे.
🟢हे मैसूर बोंड्यांचे पीठ तयार करताना ते एकदम पातळ नसावे थोडे घट्टसरच ठेवावे.
🟢आता एका मोठ्या कढईमध्ये तेलगरम करून या पिठाचे भज्यांसारखे छोटे छोटे गोळे गरम तेलात सोडावे.
तेल प्रथम कडकडीत असावे नंतर आच मंद असावी
हे मैसूर बोंडा दोन्ही बाजूंनी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत.
🟢 मैसूर बोंडा सोबत खोबऱ्याची चटणीअसावी