🍄टेस्टी व्हेज बहारदार🍄
🍄हे मी ठेवलेले या चविष्ट डिश चे नाव
हिवाळ्यात ताज्या चविष्ट भाज्या मुबलक असतात
ही डिश पट्कन होणारी चवदार
शिवाय अनेक भाज्यांना सामावून घेणारी आहे
🍄साहित्य
घेवडा
फ्लॉवर
टोमॅटो
गाजर
सिमला मिरची
(आपल्या आवडत्या कोणत्याही भाज्या)
तूप
काळे तीळ
पांढरे तीळ
टोमॅटो सॉस
चिली फ्लेक्स
ओरिगानो पावडर
मीठ चवीनुसार
🍄कृती
प्रथम भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावे
(सिमला मिरची व टोमॅटो तुकडे सोडुन)
एका बाउलमध्ये हे तुकडे घेउन त्यात भाज्या बुडेल इतके पाणी घालून
एक उकळी आणावी व पाच दहा मिनिटे झाकून ठेवावे
झाकणकाढून त्यातील पाणी वेगळे काढावे
(हे पाणी मीठ मिरपूड घालून पिऊन टाकावे अथवा भाज्यात वापरावे)
एका पॅन मध्ये तूप घालुन
तूप गरम झाल्यावर
त्यात अर्धवट शिजलेले भाज्यांचे तुकडे
सिमला मिरची व टोमॅटो तुकडे घालून
मोठया गॅस वर दहा मिनिटे टॉस करावे
त्यात मिरी पावडर, ओरीगानो, चिली फ्लेक्स व मीठ घालावे
वरुन टोमॅटो सॉस घालून
सर्व पाच मिनिटे चांगले हलवुन घ्यावे
खाण्याच्या बाऊल मधे काढून
वर भाजलेले काळे पांढरे तीळ घालावे
चवीष्ट डिश तयार आहे 😋