🫛मटार पराठा 🫛
🫛मटार सिझन आहे
गोड कोवळा हिरवागार मटार मिळतो
जमेल तितके पदार्थ जमेल तितक्या वेळा करून घ्यायचे 😊
या पराठ्या साठी
🫛साहित्य
दोन वाट्या मटार
दोन मिरच्या
बारीक चिरलेली मिरची
लिंबू रस
थोडा ओवा
मीठ चवीनुसार
फोडणीचे साहित्य
पारी साठी एक वाटी कणीक एक वाटी डाळीचे पीठ
🫛कृती
तेलात जिरे टाकून
हिरवा मटार फोडणीला टाकून वरचेवर वाफवुन घ्यावा
कुकरला वाफवला तर याचा रंग बदलतो त्यामुळे तो शॉर्टकट टाळायचा
मटार ची मूळची चव आणि रंग राखायचा असेल तर...
तिखट
हळद
कोणतेही मसाले
बटाटा
लसूण पेस्ट
या गोष्टींचा मोह टाळायला हवा
फक्त आणि फक्त मटार..❤️
🫛या वाफवलेल्या मटार मध्ये बारीक चिरलेली मिरची ,कोथिंबीर, मीठ व लिंबाचा रस घालावा
हाताने अथवा मॅशरने चुरडून घ्यावे
सारण जाडसर असावे
फार थलथलीत करू नये
🫛पारी साठी कणीक व डाळीचे पीठ मीठ व ओवा घालून भिजवून घ्यावे
एक तास पीठ भिजल्यावर
पीठाचे दोन गोळे करून
पोळी प्रमाणे लाटून मध्ये सारण भरून हाताने थोडे दाबून घ्यावे
हलक्या हाताने परोठा लाटून
तुपावर अथवा तेलावर खमंग भाजावा
🫛सोबत दही आणि टोमॅटो 🍅सॉस..😊