तिला सोनचाफा आवडतो समजताच
तो थोडा जास्तच कुंपणातला चाफा जपायला लागला
कधीतरी बहरेल या आशेने
रोज थोड हितगुज करायला लागला
त्याच तिची आवड जपण
खुप काही सांगत होत
प्रत्येकाच प्रेम अपेक्षेने भरलेल असत
त्याला मात्र प्रेम जपण माहित होतं
कदाचित तो चाफा तिच्या केसात तो माळू नाही शकणार
पण
कधी गेलीच ती घरासमोरून तर
त्याचा सुगंध मात्र तिच्या पर्यंत पोहोचणार होता.......
- तुझाच सोनचाफा.......