स्वर कोकिळा- स्व. लता दीदी
(सन 1929-2022)
मला वाटतं आपण खरंच भाग्यवान आहोत कारण ही पंचरत्ने आज आपल्या भारतात आहेत. लता आशा उषा मीना आणि लाडके हृदयनाथ,
ही पाच भावंडे म्हणजे जणू काही स्वरसाधनेची शक्तीपीठे आदिनाथ,
सकाळच्या प्रहरी कानात सुमधुर नाद घुमायचा तो भूपाळीचा,
दुपार संध्यकाळ रात्र असो की दिवस सतत विविध गाणी कानावर पडून मन आणि तन घेत होते तृप्तीचा सहवास,
गेली कितीतरी वर्षे या सर्वांनी आपल्या सुमधुर आवाजाने आपल्याला केले आनंदी आणि चैतन्यमय,
म्हणुनच या धकाधकीच्या जीवनात त्यांचे गाणे ऐकून मन होते प्रसन्नमय,
कोणताही सण असो वा मंगलमय पूजा किवा धार्मिक कार्यक्रम,
दीदींच्या गाण्याशिवाय इतर कोणत्याच गाण्यांना नव्हता अग्रक्रम,
लहापणापासून ते आतापर्यंत या पाच भावांडानीच भूषवली होती सुरेल मैफिल,
पण अचानक त्या जातील असे न वाटल्याने सारेच चाहते राहिले गाफील,
कठीण परिस्थतीतही आपल्या भावंडाना सांभाळून त्यांना शिकवली स्वर साधनेची प्रार्थना ,
पाच ही जन गान विद्येत झाले पारंगत आणि त्यांनी केली गान देवता सरस्वती ची आराधना,
ब्लॅक अँड व्हाइट पिक्चर च्या जमान्या पासून ते आतापर्यंत हजारो गायली दीदींनी सुंदर मन प्रसन्न गाणी,
म्हणुनच आज त्या सर्व भारतीयांच्या ह्रदयाच्या बनल्या आहेत हिरकणी,
मला वाटतं की परमेश्वरा ने सुद्धा दीदींना म्हटले असेल चला तुमचं पृथ्वीवरचं कार्य संपलय आता मी तुम्हाला स्वर्गात न्यायला आलोय करू नका चिंता,
गेली 2/3वर्षे करोना मुळे गर्दी वाढली तिकडे ,
प्रत्येकांच्या पाप पुण्यानाचा हिशोब करून मन थकलय एकडे,
जन सामान्यांपासून ते अमिरांपर्यंत सर्वानाच दिला आस्वाद तुमच्या विविध रंगी गाण्यांचा ,
आता आम्हालाही तृप्त करा तुमच्या सुरेल मैफिलिने जादुई संगीताने मधहोष आवाजाचा ,
आज देव सुद्धा दीदींच्या मधासारख्या आवाजाने होतील तृप्त,
आणि तिला आशीर्वाद देतील चिरंजीवी भव असा सुप्त,
जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत दिदिंचे नाव राहील अजरामर,
कारण या मंगेशकर कुटुंबाने संगीतात खूप काही दिलय म्हणुन च होत राहील त्यांचा जयजयकार,
अशा या पंचरत्नांना आमचा सर्व भारतीयांचा मानाचा मुजरा ,
लहानां पासून ते मोठ्यानं पर्यंत सर्वच देतील हक्काने व अभिमानाने दुजोरा,
अशा या गान कोकिळेला स्वरसम्राज्ञीला संगीताच्या महाराणीला आम्हा सर्वांकडून मनापासून व हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली व या जग विख्यात स्वरहिरकणी ला तसेच आमच्या लाडक्या दिदीला अश्रू नयनांनी आदरांजली व पुष्पांजली!!