Quotes by Sayali Warik in Bitesapp read free

Sayali Warik

Sayali Warik

@sayaliwarik195449


तुझ्याविना सारेच रे बाप्पा अपूर्ण
तू सोबत आहेस या विचारानेच सारे जीवन संपूर्ण
तुला करते नतमस्तक होऊन मनापासून शिरसाष्टांग वंदन
तुझी कृपा तुझा आशिर्वाद सदैव राहूदे आमच्या पाठीशी हे विघ्नहर्ता श्री गजानन

Read More

26 जानेवारी
आज आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा सुवर्ण दिन . अनेक देशभक्तांनी क्रांतिकारकांनी आपले दिले बलिदान,
आपण करूया त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचा सन्मान,
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताकदिन या दोनच दिवशी त्यांची काढू नका आठवण,
त्यांना कायम स्मरणात ठेवून त्यांच्या शौर्याची करू हृदयांत साठवण,
आपल्या देशभक्तांसाठी सैनिकांसाठी रोजच गाउ देशभक्तीवर गाणी,
आपण त्यांच्यासाठी त्यांच्या बलिदानासाठी एवढे तरी करूया आणुया डोळ्यावर पाणी,
आपल्या सर्वस्वाची प्राणांची कुटुंबाची त्यांनी केली राखरांगोळी,
म्हणून तर आज आपण उपभोगतोय विजयी स्वातंत्र्याची दिवाळी,
आपण एवढे तरी करूया त्यांच्यासाठी दोन मिनिटे शांत उभे राहून वाहुया त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,
तीच असेल या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या सर्व भारतीयांकडून हृदयापासून आदरांजली पुष्पांजली
जय जवान जय किसान
भारतमाता की जय
वंदे मातरम् 💐💐💐

Read More

धुक्यात हरवली वाट,
चोहो बाजूला गर्द हिरवळ दाट,
उगवली सूर्य नारायणाची सोनेरी पहाट,
आसमंतात गुंजले वासुदेवाचे सुप्रभात कीर्तन पाट,
डोईवर घेऊनी निघाल्या सुवासिनी पाणी घागर माठ,
सुवासिक फुलांनी दरवळले गाव आणि परिसर वाट,
किती वर्णन करावे गावचे रम्य पहाट,
भाग्य आमुचे कोकण निसर्ग सुंदर ललाट

Read More

स्वर कोकिळा- स्व. लता दीदी
(सन 1929-2022)
मला वाटतं आपण खरंच भाग्यवान आहोत कारण ही पंचरत्ने आज आपल्या भारतात आहेत. लता आशा उषा मीना आणि लाडके हृदयनाथ,
ही पाच भावंडे म्हणजे जणू काही स्वरसाधनेची शक्तीपीठे आदिनाथ,
सकाळच्या प्रहरी कानात सुमधुर नाद घुमायचा तो भूपाळीचा,
दुपार संध्यकाळ रात्र असो की दिवस सतत विविध गाणी कानावर पडून मन आणि तन घेत होते तृप्तीचा सहवास,
गेली कितीतरी वर्षे या सर्वांनी आपल्या सुमधुर आवाजाने आपल्याला केले आनंदी आणि चैतन्यमय,
म्हणुनच या धकाधकीच्या जीवनात त्यांचे गाणे ऐकून मन होते प्रसन्नमय,
कोणताही सण असो वा मंगलमय पूजा किवा धार्मिक कार्यक्रम,
दीदींच्या गाण्याशिवाय इतर कोणत्याच गाण्यांना नव्हता अग्रक्रम,
लहापणापासून ते आतापर्यंत या पाच भावांडानीच भूषवली होती सुरेल मैफिल,
पण अचानक त्या जातील असे न वाटल्याने सारेच चाहते राहिले गाफील,
कठीण परिस्थतीतही आपल्या भावंडाना सांभाळून त्यांना शिकवली स्वर साधनेची प्रार्थना ,
पाच ही जन गान विद्येत झाले पारंगत आणि त्यांनी केली गान देवता सरस्वती ची आराधना,
ब्लॅक अँड व्हाइट पिक्चर च्या जमान्या पासून ते आतापर्यंत हजारो गायली दीदींनी सुंदर मन प्रसन्न गाणी,
म्हणुनच आज त्या सर्व भारतीयांच्या ह्रदयाच्या बनल्या आहेत हिरकणी,
मला वाटतं की परमेश्वरा ने सुद्धा दीदींना म्हटले असेल चला तुमचं पृथ्वीवरचं कार्य संपलय आता मी तुम्हाला स्वर्गात न्यायला आलोय करू नका चिंता,
गेली 2/3वर्षे करोना मुळे गर्दी वाढली तिकडे ,
प्रत्येकांच्या पाप पुण्यानाचा हिशोब करून मन थकलय एकडे,
जन सामान्यांपासून ते अमिरांपर्यंत सर्वानाच दिला आस्वाद तुमच्या विविध रंगी गाण्यांचा ,
आता आम्हालाही तृप्त करा तुमच्या सुरेल मैफिलिने जादुई संगीताने मधहोष आवाजाचा ,
आज देव सुद्धा दीदींच्या मधासारख्या आवाजाने होतील तृप्त,
आणि तिला आशीर्वाद देतील चिरंजीवी भव असा सुप्त,
जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत दिदिंचे नाव राहील अजरामर,
कारण या मंगेशकर कुटुंबाने संगीतात खूप काही दिलय म्हणुन च होत राहील त्यांचा जयजयकार,
अशा या पंचरत्नांना आमचा सर्व भारतीयांचा मानाचा मुजरा ,
लहानां पासून ते मोठ्यानं पर्यंत सर्वच देतील हक्काने व अभिमानाने दुजोरा,
अशा या गान कोकिळेला स्वरसम्राज्ञीला संगीताच्या महाराणीला आम्हा सर्वांकडून मनापासून व हृदयापासून भावपूर्ण श्रद्धांजली व या जग विख्यात स्वरहिरकणी ला तसेच आमच्या लाडक्या दिदीला अश्रू नयनांनी आदरांजली व पुष्पांजली!!

Read More

सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसेच उणीव आणि जाणीव या सुद्धा नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण माणूस असतो तेव्हा त्याची जाणीव नसते व तो नसतो तेव्हा त्याची उणीव भासते. म्हणुनच तर याला जीवन चक्र असे म्हणतात

Read More

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते

"विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राज हंस आहे" या सुविचारा प्रमाणे खरा विद्यार्थी हा नेहमीच वेगवेगळे ज्ञान शोधून ते शिकण्याच्याच मागे असतो. खऱ्या विद्यार्थ्याला फक्त पोटा पुरते शिकून चालत नाही,तर त्याला जास्तीत जास्त शिकून वेगवेगळे ज्ञान आत्मसात करून प्रगतीच्या वाटेवर चालून उन्नती कडे म्हणजेच प्रकाशा कडे झेप घ्यायची असते कारण त्याला माहिती असते की आज जर आपण कष्ट केले प्रचंड मेहनत केली तर उद्या मिळणारे कष्टाचे फळ ही नक्कीच गोड असणार आहे. खऱ्या विद्यार्थ्याला नेहमी उंच भरारी मारणाऱ्या गरुड पक्ष्या प्रमाणे वागायला हवे. म्हणजेच केवळ परिक्षे पुरता अभ्यास न करता आपण वर्षभर अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच सध्या च्या परिस्थिती प्रमाणे तुम्ही ऑनलाईन exam घ्या की ऑफलाईन त्याला काहीच फरक न पडता तो नेहमी तयार राहायला पाहिजे

Read More

आकाश चा कागद
समुद्राची शाई
आणि वृक्षांची लेखणी करून सुद्धा
जिची ममता वर्णिता येत नाही
असा मखमली शब्द म्हणजे ... आई

Read More

माझ्या माहेरच्या अंगणात
बहरली ही कृष्ण तुळस,
भाद्रपद महिन्यात सजला उत्साहाचा झिम्मा फुगडीचा हा कळस,
आशीर्वाद आहे आई अण्णांचा या बंगल्याला खास,
तुळशीच्या रुपात आईच अवतरली जणू मज लागे हा भास

Read More

गणेशोत्सव हा केवळ सण नसून तो मालवणी माणसांच्या जीवाभावचा विषय आहे....हे उद्गार एकदम खरे आहेत. कारण गणपती हा सर्वांचाच लाडका व आवडता सण आहेमालवणी माणूस गरीब असो की श्रीमंत, सरकारी नोकरीत असो की प्रायव्हेट कंपनीत असो, रजा मिळाली किंवा नाही मिळाली तरी सुद्धा गणपतीसाठी धावत पळत कोकण रेल्वेने किंवा ए स टी ने सुद्धा गावी जातात. कारण गावच्या ओढी ने गावच्या गणपतीसाठी प्रत्येक माणूस नक्की जातोच. गणपतीच्या वेळी आपला कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला व हिरवागार असतो. त्यामुळे सगळी कडे आनंदी उत्साही वातावरण असते.

Read More

आयुष्य म्हणजे सुखादुःखाचा मेळ
आयुष्य म्हणजे जन्म मृत्यूचा खेळ,
आयुष्य म्हणजे अळवावरचे पाणी,
आयुष्य म्हणजे संकटातून मार्ग काढून योग्य दिशेने वाटचाल करणे,
आयुष्य म्हणजे सगळी संकटे पार करून उद्दिष्ट्ट्या पर्यंत जाण्यासाठी होणारी तारेवरची कसरत,
आयुष्य म्हणजे येताना रिकामे येणे अन् जातानाही रिकामे जाणे,
आयुष्य म्हणजे पैसा प्रॉपर्टी कशाच्याही मोह पाशात न अडकता, एक दिवस अचानक सगळ्याचा त्याग करून आपल्या यात्रेला निघून जाणे,
याचाच अर्थ आयुष्य म्हणजे एकट्याचा प्रवास जन्मापासून ते मरणापर्यंत कष्ट करून आपले आयुष्य योग्य मार्गी लावणे!!

Read More