नकळत झालेल्या चुकांच्या
तुजसंगे अनुभवलेल्या सुखांच्या
ओसरून गेलेल्या दुःखांच्या
मी केलाच नाही हिशोब......
सुखद त्या क्षणांचा
तुझीया अबोल पनांचा
अविरत राहिलेल्या उणीवांच्या
मी केलाच नाही हिशोब....
सर्वस्व माझीये लूटविले
होते नव्हते तुजला दिले
तुजवर केलेल्या प्रेमाच्या
मी केलाच नाही हिशोब........
तू केलेस मजवर आरोप
दिल्यास मजला यातना
सोसलेल्या प्रत्येक वेदनांच्या
मी केलाच नाही हिशोब........
देणे घेणे आपल्यातले
भाव माझीया मनातले
संग पाहिलेल्या स्वप्नांच्या
मी केलाच नाही हिशोब........
मी घेतोय आता निरोप
तुज संगे सगळ्या जगाच्या
तुझ्या प्रत्येक कर्माचा तुला
शेवटी द्यावा लागेल हिशोब.....
स्वरचित
गजेंद्र गोविंदराव कूडमाते