दिवाळी आली हो दिवाळी आली

दिवाळी हा सण आला कि सर्वांचे चेहरे अगदी आनंदाने फुलून येतात. कारण या सणाची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठयापर्यत बगतात व प्रत्येकाचा आवडता व महत्वाचा सण आहे. आपल्या भारत देशात दिवाळी हा सण प्रमुख मानला जातो. त्यासाठी हा सण पूर्ण भारतात मोठया उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. त्याच सोबत हा सण इतरही अनेक देशांमध्ये मोठया थाटामाटात साजरा केला जातो.

दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंदी वातावरण, तो दिव्यांचा लखलखीत प्रकाश, फराळाचा छानपैकी सुंगध आणि अजून बरेच काही. दिवाळी हा आनंदाचा आणि बंधुभावाचा सण आहे. या सणाला सामाजिक, वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्वही आहे.

मित्रांनो दिवाळी हा सण का साजरा केला जातो ? दिवाळीचा इतिहास खूप जुना आहे. त्याच्याशी संबंधीत अनेक पौराणिक कथा आहेत, या दिवाळी सणाचे मुख्य कारण आहे. या दिवशी श्री राम रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपून लक्ष्मण आणि माता सीतेसह आयोध्या ला आले होते. त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यातील जनतेने त्यांचे स्वागत असंख्य दिवे लावून केले. म्हणून त्या दिवसापासून हा सण सर्वीकडे सर्वजण अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळीचे असतात. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस आधी लोक हा सण साजरा करण्याची तयारी सुरु करतात. छान छान तिखट - गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे किंवा इतर काही वस्तू घेण्याचा हा मुहूर्त असतो .

दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवसात घरापुढे कंदील, आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. तसेच वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. तेलाचे लहान दिवे आणि मेणबत्या इत्यादींनी सजवले जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे घातले जातात व संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेश जी यांची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना प्रसाद, मिटाई , फराळ, भेटवस्तू इत्यादी देवाण-घेवाण करतात. या दिवशी मुले बॉंम्ब , फटाके पेटवून खूप आनंदी असतात. दिवाळीच्या दिवशी दुकाने, बाजारपेठ आणि घरे दिव्यांच्या सजावटीमुळे उजळून दिसतात. मोठे आणि लहान, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक लोक विसरतात आणि हा उत्सव एकत्र साजरा करतात. हेच या सणाचे वैशिष्ट्य आहे.

तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा……

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Marathi Religious by Brains Media Solutions Pvt. Ltd. : 111840075

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now