“ सोनं घ्या सोन्यासारखं राहा”
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवस म्हणजेच ‘ दसरा’ भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. हा उत्सव विजयाचे प्रतीक आहे, म्हणूनच याला विजया दशमी असे म्हणतात. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्या नंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणांना धन, पाटी , पुस्तके म्हणजेच सरस्वती माता आणि शस्त्र पूजन तसेच धन, ज्ञान व भक्तीची पूजा केली जाते. या सणांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपट्याच्या पानांची.
दसऱ्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून थोरामोठयांना व इतर नातेवाईकांना देऊन आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. कारण हिंदू धर्मामध्ये आपट्याच्या पानाचे फार मोठे स्थान आहे. या पानामध्ये एक प्रकारचा तेजतत्व रुपी आहे. यामुळे आपले आजूबाजूचे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आपट्याच्या पानांमध्ये ईश्वरी शक्तीचा, तत्वाचा वलय जाणवतो. आपट्याच्या पानाला सुख- समृद्धी आणि विजय मिळवण्याचे स्थान मिळाले आहे. व त्याचबरोबर पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सुद्धा अनेक आहेत. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन आणि शस्त्रपूजा ही प्रथा करायची असतात.
त्याचेच प्रतीक म्हणून दसर्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे.
Article By - Anjali Patil
Brainsmediya Solution