गौरी पूजन
सगळ्यांचा लाडका व आराध्य गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांच्या घरी मोट्या थाटामाटात झालेलं आहे. बापाच्या पाटोपाट घरामध्ये गौरी म्हणजेच महालक्ष्मी चे आगमन पण झालेलं आहे. भाद्रपद शुक्लपक्षात चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना गौराईचे पूजन करतात त्यासाठीच हा दिवस ज्येष्ठा गौरी पूजन म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ज्येष्ठा गौरी उत्सव साजरा करतात. गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतीय संस्कृती परंपरेमध्ये गौरी हे शिवशक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार गौरी च्या कथा अनेक आहेत. प्रत्येक जण आपापल्या परंपरा व पद्धती अनुसरून प्रत्येक वर्षी गौरीपूजन करतात. त्याच बरोबर पहिल्या दिवशी गौरीला विविध प्रकारच्या भाज्यांची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो आणि गोड पदार्थ बनवून गौरीला नैवद्य दाखविला जातो.
या सणाच्या निमित्ताने पौष्टिक आहाराला अधिक महत्व आहे, कारण अनेक प्रकारच्या भाज्यांची भाजी फक्त याच सणाला केली जाते. कारण पावसाचे दोन महिने झालेले असतात सुंदर असे वातावरण झालेलं असते. आरोग्याला पोषक अशा कितीतरी भाज्या उगवलेल्या असतात गौरीच्या नैवेद्याच्या निमित्ताने आमच्या सुद्धा पोटात जाऊन आपल्या आरोग्याला लाभ मिळावा म्हणून देखील या भाज्यांची भाजी करण्याची प्रथा सुरु झाली असावी. पूजेचा आणि महा नैवेद्याचा दिवस अगदी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात होतो.
Article by,
Anjali Patil
Brainsmidea Solutions