खरा खुरा इको-फ्रेंडली गणपती उत्सव
सगळ्यांचा लाडका गणपती व सगळ्यांचा आराध्य देव असणारा गणेशाचा गणेशोत्सव काही दिवसावर आहे. त्यामुळे गणपती तयार करणारे शिल्पकारांची तयारी अगदी जोरशोरात चाललेली आहे. प्रत्येक तालुक्यात, शहरात त्याशिवाय गावागावातून गणपती कारखान्यामध्ये मूर्ती तयार करण्याच्या कामगिरी मध्ये शिल्पकार मग्न झालेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी गणपतींच्या सुबक व सुंदर अशा मुर्त्या आल्या आहेत. त्याशीवाय गणपती विकण्यासाठी ठिकठिकाणी दुकाने सुद्धा सज्ज करण्यात आली आहेत .
सध्या बाजारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या ची मागणी भरपूर प्रमाणात आहे. तर शाडूच्या मूर्तीची बाजारात मागणी कमी प्रमाणात आहे. जवळपास एक - दीड महिन्या अगोदरच मूर्ती तयार करणाऱ्या दुकानात जाऊन आपल्याला हवी तशी गणेशाची मूर्तीची ऑडर देऊन जातात. व त्या प्रमाणे शिल्पकार मूर्ती घडवितात.
खरं तर गणपती चा खरा मान शाडू मातीचा आहे. पूर्वी सगळीकडे मातीचा वापर करून गणपती बनवायचे. पण हल्लीच्या जनरेशनला टाइम नाही पटकन काम करायचं आणि भरपूर पैसा कमवायचा असं आजकाल चाललेलं आहे. कारण शाडू मातीचा गणपतीला घडवायला फार उशीर व वाळायला वेळ लागतो तो वेळ वाचवायला जाऊन लोक आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती करायला सुरवात केली आहे. कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायला अगदी सोपी व वाळायला पण लवकर होते. आजकाल तर बुकिंग केलेल्या मूर्तीला नागरिक स्वतः दुकानात जाऊन गणेश मूर्तीला फेटा, धोती नेसवणे त्याशिवाय हिऱ्याची आगटी, हार, बाजूबंद, मुकूट अशा प्रकारे गणेश भक्त आपल्या गणेश मूर्तीला सजवण्याचे काम करण्याचे दिसून येत आहे.
तुम्हा सगळ्यांना खरा खुरा इको-फ्रेंडली गणपती उत्सव करायचा असेल तर आपल्या गावा शहरातील विहिरी तसेच वाहत्या नदीच्या पाण्यात विसर्जन करू नका. आपल्या घरच्या घरी मोट्या अशा टब किंवा बकेट मध्ये गणेश मुर्ती विसर्जन करा. व त्या मातीचा उपयोग आपल्या झाडांना अथवा बागेत होईल अशा प्रकारचे मटेरियलपासून बनविलेली मूर्ती आना किंवा आपण स्वतः मूर्ती बनवा. कारण वाहत्या नदीत सोडून न देता या सणा नंतर या मूर्ती ची पार्थिव आपल्याच घराच्या बागेत विलीन होऊन देणं, हा खरा खुरा इको-फ्रेंडली गणपती उत्सव आहे.
आपल्या गावा शहरातल्या नदीचा श्वास घुसमटून जात आहेत व नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे अनेक प्रकाराचे रोग तयार होत आहेत. आपल्या श्रद्धांना जपणारा पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करणे हा खरा बुद्धीचा उत्सव आहे. असा उत्सव साजरा करण्याची बुद्धी सगळ्यां थोरा मोट्याना मिळो अशी प्रार्थना आपल्या लाडक्या गणपती पप्पाकडे मनोमन प्रार्थना करते.
या गणपती उत्सवाचा भक्ती मय वातावरणाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत….
Article By.
Anjali Patil
Brainsmedia Solutions