श्रावणातला पाऊस
श्रावणातल्या पाऊसात निसर्ग जणू स्वर्गच दिसतो. खरंच सर्वीकडे हिरवीगार झाडी, सगळ्या झाडांची पाने अगदी टवटवीत - रसरशीत दिसू लागतात, त्यामुळे वातावरणात अगदी थंडावा मिळतो. पहिला पाऊस आला कि सगळेजण खूप आनंदित असतात. शेतकरी लोकाचा आंनद तर गगणात मावत नाही. कारण पाऊसाची पहिली सर आली कि शेतकरी लोकाची भागादोड चालू होते शेतात बीयाणे पेरायची.
शेतकऱ्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू वरदानच आहे. गावातील पाऊस अगदी आनंदमय असतो आणि चारीबाजूनी हिरवीगार झाडे. त्याचसोबत मातीचा सुगंध सुधा जाणवतो. व डोंगरावर हिरवेगार गवत रंगीबेरंगी छोटी छोटी फुले येतात त्याचसोबत डोंगरातून ते वाहणारे लहान लहान धबधबे त्यामुळे डोंगर अगदी बगण्यासारखा असतो. पावसाच्या आगमनानंतर काही दिवसात संपूर्ण पृथ्वीला हिरवीगार अशी शालच पांघरलेली दिसते. या पाऊसाचा आनंद, उत्साह तर साऱ्या माणसामध्ये दिसून येतोच त्याच सोबत पक्षी - प्राणी हे सुद्धा पाऊसाचा आनंद घेतात.
लहानपणी शाळेतून येताना पाऊसात भिजणे, पावसाच्या पाण्याने जमलेल्या डबक्यात कागदाच्या लहान लहान होड्या सोडणे ती मज्जाच वेगळी असते. त्याशिवाय कधी ऊन कधी पाऊस असतो त्यावेळी तर आभाळात दिसणारा तो सप्तरंगी इंद्रधनुष अगदी मनाला मोहून टाकणारा क्षण असतो.
आणि कधी कधी पाऊसात लहान लहान गाराहि पडतात, या गारा खायला तर सर्वाना आवडतात. पावसाचे थेंबे अंगावर घेत अगदी बिनधास्त पाऊसात मुक्तपणे भिजणे म्हणजे खरा पाऊस अनुभवणे असे मला वाटते.
खरं तर पाऊस तर आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. आपलं हे जीवन जगण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे. आणि हे पाणी आपल्याला पाऊस मुळेच मिळते. खरंच पावसाळा हा ऋतू सर्वांसाठी खूप लाभदायक व महत्वाचा आहे.
Article by
Anjali Patil
Brainsmedia Solutions