तुझ्या नजरेपासून कधी दूर नको करूस मला
डोळ्यांतील नितळ ओलाव्यात सामावून घे मला,
जरी कधी ओघळले अश्रू डोळ्यांतून तुझ्या
तरी डोळ्यांत तुझ्या माझे अस्तित्व गवसेल तूला...
तुझ्या गोड आवाजात सामावून घे मला,
मी जरी अंतराने दूर असेन तुझ्यापासून
तरी सोम्या असा एक आवाज दे मला
तूझ्या आवाजाच्या दिशेने साद ऐकू येईल माझी तूला....
तुझ्या प्रत्येक श्वासात सामावून घे मला
माझे श्वासही चालतील श्वासात एकरूप होऊन तुझ्या
जेव्हा तुझ्या हृदयी प्रीतीचे तरंग उमटतील
तेव्हा तुझ्या हृदयाच्या स्पंदनात शोध मला....
😘😘💓r8k8💓😘😘
-Ritu Patil