26 जानेवारी- महोत्सव स्वातंत्र्याचा
आज आहे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,
आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा सुवर्ण दिन ,
अनेक देशभक्तांनी क्रांतिकारकांनी सैनिकांनी आपले दिले बलिदान,
आपण करूया त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचा सन्मान,
स्वातंत्र्य दिन , प्रजासत्ताक दिन या दोनच दिवशी त्यांची काढू नका आठवण,
त्यांना कायम स्मरणात ठेऊन त्यांच्या शौर्याची करू हृदयात साठवण,
आपल्या देशभक्तांसाठी सैनिकांनसाठी रोजच गावीत देशभक्तीवर गाणी,
आपण त्यांच्यासाठी त्यांच्या बलिदानासाठी एवढे तरी करूया आणू या डोळाभर पाणी,
आपल्या सर्वस्वांची प्राणांची कुटुंबाची त्यांनी केली राखरांगोळी,
म्हणून तर आज आपण उपभोगतोय विजयी स्वांतंत्र्याची दिवाळी,
आपण एवढे तरी करूया त्यांच्यासाठी दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांना वाहुया भावपूर्ण श्रद्धांजली,
तीच असेल या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या सर्व भारतीयांकडून हृदयापासून आदरांजली पुष्पांजली.
"जय जवान ,जय किसान"
"भारतमाता की जय"
"वंदे मातरम्"