जगात सर्वात खोडकर आणि निर्मल नात असत
बहीण- भावाचं.
ज्या गोष्टी आई बापाला आपल्या मुलाबद्दल माहीत नसतात त्या बहीण म्हणून माहीत असतात आणि तरीही त्या तोंडावर येत नाही असं असत बहीण-भावाचं नात.
कधी बाबा जास्तच बोलून गेले तर बहिणीचा हात भावाच्या पाठीवरून फिरतो असं असत बहीण-भावाचं नात
चुकीसाठी शिक्षा म्हणून आईचा मुली वर पडत असलेला मार भाऊ झेलुन घेतो असं असत बहीण-भावाचं नात
जसे जपले नाते मुक्ताई ज्ञानेश्वरांनी तसंच निर्मल आणि निश्चल असतं नातं बहीण-भावाचं .
आज त्याच भाऊ-बहिण्याचा नात्याला उजाळा देणारा दिवस म्हणजे भाऊबीज.