एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होतो. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला
ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले- तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो
ऑटोवाला म्हणाला, साहेब अनेक लोक गार्बेज ट्रक( कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ
अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील
मला असे वाटते की, आयुष्य खूप सुंदर आहे. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात
👉🏼शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवत (घासफूस)ने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. दुसरा नियम असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी सुख, दुःखी दुःख, ज्ञानी ज्ञान, भ्रमित भ्रम आणि भयभीत भय वाटत राहतो