स्पर्धा क्रं. ७
वृत्त- वियदगंगा
लगावली- लगागागालगागागा, लगागागालगागागा
रडावे वाटले जेंव्हा हसावे लागले आहे,
बहाने मज खुशीचे का करावे लागले आहे?
कसा बाजार मोहाचा मनी मी मांडला होता,
सुखे सोडून दुःखांना जपावे लागले आहे।
कळेना मार्ग चालाया व्यथेने व्यापले आहे,
मनाची उंबरे कापुनी सजावे लागले आहे।
सदा ही सोसले आहे असे मी घाव टाकीचे,
उरी ठेवून ओझे मज जगावे लागले आहे।
सजा का एवढी मोठी मिळे साधेपणाची मज,
विजय दारात असताना हरावे लागले आहे।
अनु...🍁🍁🍁
-अनु...