बनावट रेमडेसिविर बनवून विकत असलेले टोळक्याचे भांडाफोड : दिल्ली क्राईम ब्रांचंने केली मोठी कारवाई.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच ने रुग्णांच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिविर विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे दिल्ली पोलिसांनी पाच जणांना उत्तराखंडच्या कोटद्वारमधून अटक केलीय. करोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगी ही टोळी गरजूंना २५ हजार रुपयांना एक बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकत होते.गुप्तपणे मिळालेल्या माहितीनंतर, क्राईम ब्रान्च डीसीपी मोनिका भारद्वाज यांच्या टीमने ही कारवाई केली आहे कोटद्वारच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट इंजेक्शन, पॅकिंग डब्बे आणि मशीन जप्त केल्या आहेत. तसेच पोलिसांनी आरोपींकडून रेमडेसिविरचे १९६ बनावट इंजेक्शन जप्त केले आहे. सोबतच इंजेक्शन पॅक करण्यासाठी वापरले जाणारे ३००० वायल्सही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी एक ट्विट करून नागरिकांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न केलाय.या ट्विटमध्ये त्यांनी बनावट रेमडेसिविर कशा ओळखायच्या याची माहिती दिली आहे. रेमडेसिविर आणि रुग्णांना उपयोगी पडणाऱ्या अनेक औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार मानवतेलाही काळिमा फासतोय.कोरोना उपचारासाठी लागणारे रेमडिसिव्हर मिळावे ह्यासाठी नातेवाईक तासंतास रांगेत उभे राहत आहेत. याचाच फायदा घेत काही लोक नकली रेमडिसिव्हरची विक्री करत नागरिकांची फसवणूक करत आहेत. कुठे रेमडिसिव्हर साठी हजारो रुपयांची मागणी केली जात आहे, तर कुठे नकली रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले जात आहे.