उल्हासनगर महानगर पालिका चे रिटायर ज्येष्ठ नागरिक यांना आज दिनांक २६ तारीख झाली तरी पेन्शन मिळाली नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये रिटायर कर्मचाऱ्यांना इतर महानगरपालिके पेक्षा पहिलेच कमी पेन्शन मिळत आहे ती पेन्शन सुद्धा वेळेवर मिळत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक ज्येष्ठ नागरिक सही करत नसल्या मुळे किंवा ज्यांच्याकडे एटीएम कार्ड सुविधा नसल्यामुळे त्यांना बेंक मध्ये जाऊन पासबुक वर एन्ट्री करून पेन्शन आली किंवा नाही याची माहिती घ्यावी लागते काही ज्येष्ठ नागरिक तर चालू शकत नाहीत त्यांना रिक्षा मध्ये बसवून नातेवाईक बँक मध्ये घेऊन जातात .शासन नियमानुसार ज्येष्ठ नागरिक यांना महिन्याच्या एक तारखेला पेन्शन देणे ही तरतूद असताना सुद्धा प्रत्येक महिन्यात ८ ते १२ तारखे पर्यंत उल्हासनगर महानगर पालिका पेन्शन देत आहे. परंतु कोरोना महामारी मध्ये राज्य भरातील ज्येष्ठ नागरिकांनी घरा बाहेर पडू नये व आपली प्रकृती सांभाळावी म्हणून शासन आदेश देत आहे. परंतु उल्हासनगर महानगर पालिका चे रिटायर ज्येष्ठ नागरिक यांना मात्र पेन्शन साठी सतत बेंकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. ही मोठीच आश्चर्याची बाब आहे..