मैतरणी ग मैतरणी
पडे चांदणे तुझ्या अंगणी
चंद्रबिंब ते माझ्या नयनी
पाहता तुजला तूच दर्पणी
बिलोरी चाहुल माझ्या कंकणी
हाक तुझी ती पडता कानी
थबकून जाते माझी वाणी
मंतरलेल्या रम्य त्या क्षणी
तरळल्या ग हळव्या आठवणी
मैतरणी ग मैतरणी
मैतरणी ग मैतरणी
-Aaryaa Joshi