"प्रेम म्हणजे फक्त मिळवणं च नव्हे तर कुणाच्या आनंदासाठी केलेल्या त्याग तेही प्रेमच असतं, प्रेम म्हणजे सर्व दुनियसमोर उघडपणे दाखवणेच नाही तर अलगद मनात ही नाजूक भावना जपणे हे ही प्रेमच असतं. कुठल्याही परिस्थितीत प्रेमाला मिळवणं किंवा तसा अट्टाहास धरून इतरांना दुखावणे यात फक्त स्वार्थ असावा, पण विरहातल प्रेम मात्र नेहमीसाठी अमर राहतं. त्यात कुठलीच अपेक्षा नसते, हाव नसते, जळफळाट नसतो. असतं ते फक्त आणि फक्त निस्वार्थ, निखळ प्रेम. "
-Pradnya Narkhede