सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा... साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला एक दिवस म्हणजेच दसरा होय... हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो .. या दिवशीच्या विजय मुहूर्तावरच लोक आपला नवीन उपक्रम व शुभारंभ करत असतात.. नवरात्रीच्या पर्वा नंतर येणारा सण म्हणजेच दसरा.....दुर्गा मातेच्या पूजनाचे नऊ दिवस आनंदित असलेल्या दुर्गामाता च्या उपासनेने मिळालेली भौतिक ऊर्जा च प्रतीक आनंदित पणे साजरा केला जाणारा सण म्हणजे दसरा. . सत्याचाच नेहमी जय असते याचे प्रतीक म्हणजेच दसरा.. असे म्हणतात की श्री रामचंद्र प्रभू यांनी देखील दुर्गेची नऊ दिवस पूजा व आराधना केल्यानेच त्यांना विजय प्राप्त झाला.. सत्यशील असणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व शांती सागर असलेल्या श्री रामचंद्र प्रभूंचा क्रोधी अधर्मी दुराचारी रावणावृत्तीचा विजय ..याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र आणि यांच्या युद्धामध्ये सत्याचा विजय आणि रावणाचा नाश झालेला आहे त्यामुळे देखील हा सण साजरा करतात..महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला, रात्री असुराला मारले.. तेव्हापासूनच तिला महिषासुरमर्दिनी हे नाव पडले..जगामध्ये जेव्हा-जेव्हा असुर व क्रूर वृत्ती उत्पन्न होते तेव्हा तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी साक्षात भगवंताला ही अवतार धारण करावे लागते त्यांचा विजय म्हणजेच सत्याने घातलेली साद ...दसरा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते झेंडूची आणि आंब्याच्या पानांची तोरणे ..संपूर्ण घरभर स्वच्छता आणि अंगणात सडा-सारवण करून केलेली पांढरीशुभ्र रंगोळी..या सणात झेंडूच्या पानाचे फुलांचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच आपट्याच्या पानांचे महत्त्व आहे ..आपट्याचे झाड हे आता दुर्मिळ होत चालले आहे...या दिवशी सकाळीच पूजा करून देवघरामध्ये संपूर्ण प्रकारच्या धान्याच्या राशी मांडल्या जातात..जेवढे आपल्याकडील फळे असतील तेवढी फळे देखील ठेवतात.. दिवसभर नंदादीप लावलेला असतो.. अगरबत्तीचा घमघमाट अन कापुराचा सुवास संपूर्ण घरभर दरवळतरवत असताना या सणाची चाहूल घेऊन येतो.. स्वयंपाकामध्ये गोड धोड जेवण करून नैवेद्य केले जाते...कुणी पुरणपोळीचा स्वयंपाक तर कुणी लाडवाचा!!! आमच्याकडे मात्र केळ्यांचे शिकरण किंवा खीर केली जाते... आपल्याकडील असलेल्या अस्त्र शस्त्रांची पूजा केली जाते.. योग्य प्रकारे सर्वांचे स्वच्छता करून त्यांना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात अगदी दरवाजापासून ,कार, ट्रॅक्टर, गाड्या इत्यादी पर्यंत...✍️✍️💞 Archu💞सायंकाळच्या वेळी मळ्यातून घरी येताना घरातील माणसांनी सोन्याची पेटी आणायचे असते... त्या पेटीमध्ये आपट्याची पाने, झेंडुची फुले ,आरटी बोराटी ही काटेरी झाडांच्या , काही फांद्या, रुईचे पान इत्यादी असतात.... माणसांनी ते घरांमध्ये आणायच्या अगोदर दरवाजा मध्ये उभा राहून सोनं लुटायचं असतं ..घरातील ग्रहलक्ष्मी हातात आरतीचे ताट घेऊन ओवाळण्यासाठी दरवाज्यात उभी असते.. दरवाजा बाहेरील व्यक्तींचा ओवाळून त्यांची व त्यांच्या हातातील सोन्याची पूजा केली जाते.. त्यानंतर घरात येऊन घरातल्या अस्त्र शस्त्र जवळ ठेवलं जातं..त्यामध्ये शेतीतील काही कामाच्या वस्तू जसे की खुरपे ,वीळा खलबत्ता तराजू इत्यादी लोखंडाच्या वस्तू ठेवलेल्या असतात.. देव पूजा करून सर्व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतले जाते..संपूर्ण गावभर फिरून प्रत्येकाच्या घरातील उंबऱ्याच्या आत जाऊन तेथील देव पूजेचे दर्शन घेतल्यानंतर तेथे असणाऱ्या वडील माणसांचे दर्शन घ्यायचे असते..वर्षभरातून एकदा येणारा हा सण म्हणजेच आशीर्वादाची परवणी घेऊन आलेला असतो.. अनेक थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात..पुन्हा एकदा तुम्हाला विजयादशमीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा...हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..प्रत्येक गावाकडे दसरा साजरा करण्याची वेगळी पद्धत आहे... तुमच्याकडे कशी आहे???आमच्या सारखेच तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का?? हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.. आवडल्यास माझ्या लेखाला शेअर जरूर करा..तुमच्या आमच्या मधील✍️✍️💞Archu💞
-Archana Rahul Mate Patil