मिसाईल मॅनची अखंड उर्जा
कुणी जीवन उपभोगी अतिरिक्त
कुणी साठवी पैसा मुलांसाठी फक्त|
कुणी मढवी जीवन अहंकार, पदांनी
दाता शिक्षक हा गेला रिक्त हस्तांनी||
भाव सर्वांमनी चिरंतन आदराचा
प्रयत्न सदैव विद्यार्थी बनण्याचा||
अग्नपंखी रोहित जन्माचा
दिवस हा असे वाचनप्रेरणेचा||
विद्यार्थीप्रेमी अन् पुस्तकप्रेमी भारतरत्नाचे
स्वप्न सदैव भारताच्या प्रगतीचे||
शास्त्रज्ञ,राष्ट्रपती , मिसाईल मॅनचे
लेखकरूपी विचारवाहकाचे,दर्शन अखंड उर्जेचे||
-मनमानसी